यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आ. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नातून पुर्णत्वास गेलेल्या शेळगाव धरण व मोर मध्य प्रकल्प यासह इतर शेतकरी बांधवांच्या प्रश्नाशी निगडीत विविध विषयांवर बैठक संपन्न झाली.
आ. शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाच्या कामांबाबत आज बुधवार, दि. २७ सप्टेंबर रोजी आढावा बैठकीचे तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव येथे आयोजन करण्यात आले होते.
या आढावा बैठकीमध्ये यावल तालुक्यातील हिंगोणा क्षेत्रातील मोर मध्यम प्रकल्पाच्या पुराचे अतिरिक्त पाणी कालवा सा.क्र. ५०० मी. वरून बंदिस्त पाईपलाईने लगतच्या नाल्यात सोडण्यासाठी व वितरिकांवरील बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्ण करणे; तसेच सौर ऊर्जा उभारणे बाबतची कार्यवाही करणे. इ. कामे ही सर्वेक्षण अंदाजपत्रक मंजूर करण्यात आली असून सर्वेक्षणानुसार प्रस्ताव त्वरीत तयार करण्यासाठी एक महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे आमदार शिरीष चौधरी निर्देश दिले आहेत.
मंगरूळ मध्यम प्रकल्प – धरणाखाली बोकड नदीमध्ये चार बंधारे व पाणी पुनर्भरण विहीर बांधणे, बंधारे बांधणे बाबत जलसंधारण विभागाकडे प्रस्ताव सादर करणे. तसेच बंदिस्त पाईपलाईनद्वारे कर्जोद गावाच्या नाल्यात पाणी सोडणे इ. कामांचे १ महिन्याच्या आत प्रस्ताव सादर करणे.
वड्री लघु प्रकल्प – या प्रकल्पाच्या लघु तलावाचे पुराचे अतिरिक्त पाणी लगतच्या पाझर तलावात सोडणे व टेल चँनल मधील अपूर्म कामे पूर्ण करणे. तसेच गंगापूरी लघु प्रकल्पाच्या लघु तलावाचे अतिरिक्त पाणी लगतच्या पाडळे पाझर तलावात सोडणे या कामांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले.
हतनूर काल्यावरील सहकारी उपसा सिंचन योजना यात आमोदा, बामणोद, म्हैसवाडी, सावदा यांचा सर्वेक्षण करून डी.पी.आर 2 महिन्यात करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाल उपसा सिंचन योजनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्रासह अंदाजपत्रक एक महिन्यात तयार करून मंजूरीसाठी सादर करण्यात यावीत.
तसेच शेळगांव बँरेज चे काम पूर्णत्वास आल्याने शेळगांव बँरेज सर्व दरवाजे बंद करून त्यात पाणी साठा आजापासून सुरू करणार आहेत. मागील तीन वर्षात शेळगाव प्रकल्पास सुमारे ३५० कोटी निधी मिळाल्याने सर्व पुलांची कामे जोमाने सुरुवात होऊन आमदार शिरीष चौधरींच्या कार्यकाळात पावसाळ्याआधी पूर्ण होत आहेत .
शेळगाव बामणोद रस्त्यावरील तापी नदीवरील उंच पुलाच्या बांधकामास जलदगतीने सुरुवात होऊन पुढील वर्षापर्यंत पुल पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेळगाव प्रकल्पावरील पुलांची कामे आमदार शिरीष चौधरींच्या कार्यकाळात प्रस्तावित झालीत शेळगांव बँरेजच्या पूर्णत्वासाठी आ. शिरीष चौधरी यांनी प्रयत्न करून बँरेजच्या एकूण किंमती पैकी त्यांच्या कार्यकाळात निम्म्यापेक्षा जास्त निधी आणला गेला आहे. त्यामुळेच बँरेज काम पूर्ण होण्यास मदत झाली आहे. यावल उपसा सिंचन योजनेच्या मान्यतेसाठी प्रयत्नशील आहेत. शेळगांव बँरेज वरील शेळगांव बामणोद उंच पुलाचे कामाचा आढावा घेवून सदरील पुल जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सुचना आमदार शिरीषदादा चौधरी यांनी दिल्या.
सदर बैठकीत आ. शिरीष चौधरी, व्ही.डी.पाटील, माजी अधिक्षक अभियंता, मा.य.का.भदाणे, अधिक्षक अभियंता, जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळ, दळवी अधिक्षक अभियंता, जी.एस.महाजन कार्यकारी अभियंता, के.पी.पाटील सेवानिवृत्त उपअभियंता कडलग, कार्यकारी अभियंता, दाभाडे, भोसले, वैशाली ठाकरे, आदिती कुलकर्णी, सर्व कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता.