शेत नागरतांना टॅक्टर पलटी; अल्पवयीन चालकाचा जागीच मृत्यू

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेत नागरत असतांना टॅक्टर पलटी होऊन एका पंधरा वर्षीय मुलाचा जागेच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून याबाबत रावेर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत वृत्त असे की, विश्राम जिन्सी भागात घुबड्या जंगलामध्ये हरदास शंकर राठोर यांच्या शेतामध्ये शेताची मशागत म्हणुन दलसिंग घ्यालसिंग भिलाला (वय १५) हा ट्रक्टर चालवत नांगरणी  करत होता. त्याचा ट्रक्टर वरील ताबा सूटल्याने ट्रक्टर शेताला लागून असलेल्या नाल्यामध्ये जाऊन पलटी झाले. या अपघातात चालक दलसिंग भीलाला जागीच ठार झाला. शेत मालक हरदास राठोर यांच्या खबरीवरुन रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक विशाल सोनवणे व पोलिस सहकारी करीत आहे.

Protected Content