जामनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील गोरनाळा शिवारातील शेतातून १ लाख ३४ हजार ५०० रूपये किंमतीचा गहू आणि कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात बुधवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुपडू संतोष पाटील (वय-४२) रा. गोरनाळा ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता त्यांनी त्यांच्या शेतातील पत्र्याचे शेड बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पत्राचे शेडचे कुलूप तोडून आत ठेवलेला आत ठेवलेला १७ क्विंटल कापूस आणि गहू असा एकूण १ लाख ३४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून येण्याचे उघडकीला आले आहे. हा प्रकार बुधवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास उघड केला आला आहे. या संदर्भात शेतकरी सुपडू पाटील यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जयसिंग राठोड करीत आहे.