शेतमजूर युनियनतर्फे विविध मागण्यांंसाठी निदर्शने (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।   सर्वांसाठी घरे या योजनेच्या अंतर्गत घरे मिळावीत, जॉब कार्ड मिळावेत आदी मागण्यांसाठी शेतमजूर युनियनतर्फे (लाल बावटा)  पंचायत समितीसमोर निदर्शने  करून गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

आसोदा येथील सरपंच  अनिता दिलीप कोळी व सर्व १७ ग्रामपंचायत सदस्यांचा पाठींबा असतांना ग्रामसेवक टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप  शेतकरी युनियन (लाल बावटा) जळगाव जिल्हा समितीतर्फे कॉ. विनोद  अढाळके यांनी केला. त्यांनी पुढे सांगितले की,  ग्रामसेवक स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी गावात केवळ २ दिवस येतात. तेव्हा देखील वेगवेगळी कारणे देवून कामे टाळत असल्याने आम्ही त्यांचा निषेध करतो. जो पर्यंत अतिक्रमण धारकांना ५०० चौ/फुट जागा व घरकुल बांधण्यासाठी दीड लाख रुपये रुपये मिळत नाही तोपर्यत लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी आंदोलकांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनाचा आशय असा की,  गेल्या २ वर्षांपासून वारंवार मागण्या करूनही शासनस्तरावर कोणतीही कारवाई झालेली नाही.  आसोदा, ममुराबाद, विटनेर या गावातील नागरिकांनी  रोजगार हमी योजनेंतर्गत  अर्ज केलेला आहे. मात्र, या नागरिकांना रोजगार तर मिळाला नाहीच परंतु जॉब कार्ड देखील मिळाले नसून या नगरीकांना जॉब कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे.  आसोदा गावातील अतिक्रमण केलेल्या निर्वासित नागरिकांना ५०० चौ/फुट मोजून देण्याचे आदेश काढावेत, नमुना ८ रजिस्टरमध्ये नोंदविण्याचे ताबोडतोब आदेश देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी कॉ. विनोद  अढाळके, गोकुळ कोळी, वंदना सपकाळे, सुनिता कोळी, वसंत सपकाळे, लता कोळी, रंजना कोळी, मंगला सोनवणे, शशिकला कोळी, वैशाली कोळी, मंगल भिल, विश्वनाथ सुतार आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1674749706064204

 

Protected Content