शेतमजुरी करणार्‍या आईबापाचा मुलगा व चहा विकणारा झाला मुंबईचा फौजदार

पाचोरा नंदू शेलकर । शहरातील बाहेरपूरा येथील रहिवाशी असलेले वाल्मिक महाजन या तरूणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ४० व्या रँकमध्ये उत्तीर्ण होवून पीएसआय पदावर आपले नाव निश्चित केले.

माळी समाजाचे कार्यर्कर्ते शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन  यांचे लहान बंधू वाल्मिक एकनाथ महाजन रा. बाहेरपुरा, पाचोरा जि. जळगाव येथील रहीवाशी असुन वाल्मिक महाजन यांच्या परिवाराची परिस्थिती एकदम हलाखीची सामन्य कुटुंबातले एक होतकरू व्यक्तीमत्व परिवाराच्या आज्ञेत राहुन व परीस्थितीला तोंड देऊन त्यावर मात करत जीद्दीने दिवसरात्र अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या  (एम. पी. एस.सी.) परीक्षेत ४० व्या रॅकं ने उत्तीर्ण झाले व मेहनतीने साध्य करून दाखवत पी. एस. आय. पद संपादन केले आहे.

वाल्मिक महाजन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी शाळेतून झाले‌. १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे बी. एस्सी. अॅग्री पदवी घेतली. तद्नंतर मुबंई पोलीस दलात १० फेब्रुवारी २००९ रोजी कॉन्स्टेबल पदाची जबाबदारी स्वीकारून अंधेरी पोलीस ठाणे (मुंबई) येथे ५ वर्ष कर्तव्य बजावत असतांनाच परिवराला संभाळून अभ्यास केला. अभ्यास करत असतांना खुप संकट आली. संकटाना तोडं देवून कुठल्याही परिस्थितीत धीर न सोडता वाल्मिक महाजन यांनी परिवाराचे पाठबळावर आपले पोलिस दलातील कर्तव्य बजावत सदैव एम.पी.एसी. परिक्षा देतच राहीले. अखेर दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ४०० पैकी ३५१ गुण मिळवून घवघवीत यश मिळवत त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. 

 

वाल्मिक महाजन आईवडीलांचे जिवन एकदम अंधकारमय होते. आईवडील अशिक्षित व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा गाडा हाकत संपुर्ण जीवन गेले. वाल्मिक महाजन यांना एक मोठा भाऊ व चार बहिणी असा परिवार आहे. शिक्षण घेत असतांना आपले मोठे भाऊ विठ्ठल एकनाथ महाजन यांच्या चहा च्या स्टॉलवर काम केले. सोबत कुठलाही वारसा  पाटबळ पाठीमागे नसतांना,  शुन्यातुन जग निर्माण केले. आईवडीलांचे  कष्टाचे चीज करण्याचे ध्येय डोळ्या समोर  ठेवून वाल्मिक महाजन यांनी शिक्षण घेतले.

 

तसेच शिक्षण घेत असतांना छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, डॉ. बाळासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाधारेचे शिक्षक कालकथित सुभाष सपकाळे त्यांच्या घरी नेहमी भाजी विक्री व्यवसाय करणारी मोठी बहीण अजंना आनंदा महाजन व भाऊ विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) यांना महात्मा फुले यांचे गुलांमगीरी नावाचे एक पुस्तक परीस रूपी  भेट देऊन, पुढील वाटचलीस शुभेच्छा दिल्या. आणि ते पुस्तक वाचुन वाल्मिक महाजन यांचे विचार परीवर्तन झाले. आणि लोखंडाला परीस पर्श होताच आज लोखंडाचे सोने झाले. ही महापरूषांची विचारांची देणगीचे स्वरूप आणि त्याचेच फलित आहे. तसेच वाल्मिक महाजन यांना शैक्षिणीक जिवनात मार्गदर्शक म्हणुन लाभणारे सर्व बुहजन समाजाचे मार्गदर्शक म्हणून नायगाव (मुंबई) ओमकार करीअर अकॅडमीचे संतोष पवार व राम नरेश यादव तसेच क्रिडा प्रशिक्षक (मुंबई) येथील योगराज गिरधर माळी, जागृती विद्यालय पाचोरा येथील शिक्षक वर्ग, एम.एम. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वासुदेव वले, एस. बी. चौधरी, बी. टी. मिस्तरी तसेच जळगांव कृषी अधिकारी एनोमोद्दीन समसोद्दीन शेख, याऊद्दीन खाटीक (मुबंई), पोलीस सजन पाटील, जळगाव पोलीस सचिन श्रवण वाबळे, कृषी विस्तार अधिकारी भालेराव, जालना पोलीस एस. बी. राजडे तसेच वडीलांचे मित्र संस्कृत भाषेचा अभ्यास शिकवणारे जिवराम गोबा पाटील (वडगाव टेक) ह्या गरूजनांच्या अशिर्वाद व मार्गदर्शना मुळे वाल्मिक महाजन यांना यशाचा शिखर गाठता आला. वाल्मिक महाजन यांचे वडील कै. एकनाथ दौलत महाजन, आई ग.भा. रूख्माबाई एकनाथ महाजन यांच्या आशीर्वादाने मोठे भाऊ शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन हे श्री. संत सावता महाराज टी स्टाॅल शिवाजी महाराज चौक, पाचोरा, या स्टॉलवर वाल्मिक महाजन चहाविक्री व्यवसाय करून शिक्षण घतले.

 

वाल्मिक महाजन यांच्या पत्नी सुवर्णा वाल्मिक महाजन व बेबाबाई विठ्ठल महाजन, बहीणी अंजना वंदना रंजना, जया, भाचे अशोक आनंदा महाजन, बबलु  या सर्व परिवाराने एकसंघ राहुन, मोठे स्वप्न पाहुन शिक्षणासाठी लागणारा आर्थिक हातभार लावुन वाल्मिक महाजन यांना उच्च पदावरती पोहचविण्यचे काम केले. आणि आज त्यातुन आनंद मिळविला. वाल्मिक महाजन यांच्या यशाचे संपुर्ण पाचोरा शहरातुन व परिसरातुन कौतुक अभिनंदन होत आहे.

Protected Content