शेतकऱ्याची यशोगाथा : सेंद्रिय खतांचा वापर करत भरघोस उत्पन्न

पाचोरा, नंदु शेलकर ।   शेतकरी एकीकडे निसर्गाचा  लहरीपणा, रासायनिक खतांचा अति वापरामुळे नापिकीमुळे त्रस्त झालेला असतांना पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील प्रगतीशील शेतकरी नामदेव विश्राम महाजन हे विविध प्रयोग करत  सेंद्रिय खतांचा वापर करून साडेदहा एकर शेतजमिनीतून भरघोस उत्पन्न घेतांना दिसत आहेत. 

नामदेव महाजन यांची स्वतःच्या मालकीची साडेदहा एकर शेती असून इतर शेतकऱ्यांकडे दोन एकर शेतीही ते बटाईने करतात. आपल्या शेतात ते माती, पाणी, पिके, खते वृक्ष याबाबत विविध प्रयोग करत असतात.  या प्रयोगांची समाजाला माहिती देऊनही लोक शिक्षण करत असतात.  ते सामाजिक जाणिवेतून आपल्या याउत्पन्नापैकी काही हिस्सा समाजाचा समाजहिताच्या कामांवर खर्च हि करत असतात.

 

श्री. महाजन यांचे कृषी व इतर समाज कार्याची माहिती

विषमुक्त, नैसर्गिक सेंद्रिय, शेती  – पूर्वीच्या काळी रासायनिक खते व रासायनिक कीटनाशक वापरत नसत. त्याचप्रमाणे  नामदेव महाजन हे गेल्या आठ वर्षांपासून आपल्या शेतीत एक ही खताचा दाणा रासायनिक खत व एकही थेंब केमिकल कीटकनाशक वापरत नाहीत.

ते जमिनीची सुपीकता कशी वाढवतात?

नामदेव महाजन हे देशी गायीचे गोमूत्र, गुळ, बेसन पीठ, शेण, माती व पाणी तिन्ही प्रक्रियेतून स्वतःच्या शेतातच तयार केलेले जीवामृत बनवून ते पिकांना देतात. तसेच देशी गाईच्या शेणापासून बनविलेले घन जीवामृत व घनजिवामृत पिकांना देतात. शेतातील गवत, तण, कचरा बाहेर न फेकता जमिनीवर कापून, सडू देतात. त्यासाठी ते जमिनीवर कास्ट अच्छादनही करतात. हा जैविक कचरा व जीवामृताच्या प्रक्रियेतून जमिनीत उत्तम ह्युमस व पोषक घटक तयार होतात. यामुळे बागेस कमी पाणी लागते म्हणजे पाण्याची बचत होते. रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशके न वापरल्यामुळे त्यांच्या जमिनीत सर्वत्र गांडुळांची संख्या प्रचंड वाढलेली असून, त्यांची जमीन ही गांडूळांचे माहेरघर व गांडूळ खतांचे आगार बनलेली आहे व सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे त्यामुळे त्यांची जमीन ही एक प्रकारे बलवान व पहिलवान बनल्यामुळे केवळ पाणी व जीवामृत त्यामुळे भरपूर उत्पन्न मिळते व खर्च ही वाचतो.

कीटकनाशक वापरत नाहीत, पिकांवरील रोग जंतु कसे नष्ट करतात

पिकांवरील हानिकारक / शत्रु जीवजंतू/ किटक कोणते व उपयोगी / मित्र जीवजंतू / किटक कोणते यांचे ज्ञान व भान असल्याने ते जीवजंतू व किटक यांना घाबरत नाहीत कारण अनेक जीवजंतू व किटक हे शेतीस उपयोगी असतात. तरीही हानिकारक किटक व जीवजंतू दिसल्यास ते वनस्पतींपासून शेतातच बनविलेला लमित अर्क, अग्निअस्र, ब्रह्मास्त्र, लिंबोळी अर्क बनवुन त्यांची फवारणी करतात. तसेच जिवामृता ची फवारणी करतात. त्यामुळे फक्त हानिकारक / शत्रु किडे हे मरतात व मित्र किडींचे संरक्षण व पोषणच होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/265300652104793

 

Protected Content