यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव द्या आणि पिक विम्याची रक्कम तातडीने खात्यात वर्ग करावी या मागणीसाठी काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावल तालुका काँग्रेस कमेटी व परिसरातील शेतकरी बांधव यांच्या वतिने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी कांधवांना केळी पिक विम्याची रक्कम तात्काळ मिळणे व कापसाला भाव नाही आणि शासनाकडून अद्याप पावेतो खरेदी करण्यात येत नसल्याने शेतकरी बांधव यांना विविध संकटांना व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने शासनाने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, यासाठी कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल तहसीलदारांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अमोल भिरूड, राजु अरमान तडवी, ज्ञानेश्वर बऱ्हाटे, सुलेमान तडवी, डिगंबर पाटील , कदीर खान , पद्दमाकर पाटील , सतिष पाटील , हाजी गफ्फार शाह , समाधान पाटील, मुक्तार पटेल, संदीप सोनवणे, विशाल फेगडे , धिरज कुरकुरे , अनिल महाजन व शेतकरी बांधवांच्या स्वाक्षरी आहे .