शेतकऱ्यांचा विजपुरवठा खंडित करू नका : भाजपा जळगाव तालुकातर्फे इशारा (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे हाताचे पीके नष्ट झाली त्यात आता महावितरण कंपनी वीजबिल सक्तीच्या नावाखाली विद्यूत प्रवाह खंडीत केला जात असल्याचा प्रकार सुरू आहे. विद्युत प्रवाह सुरळीत करण्यात यावा अन्यथा भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.

 

दरम्यान, भाजपा तालुका पदाधिकारी व शेतकरी निवेदन देण्यसाठी महावितरणच्या मुख्य कार्यालयात गेले असतांना त्यांना अडविण्यासाठी गेट बंद करण्यात आल्याचा आरोप भाजपा जळगाव तालुका अध्यक्ष गोपाळ पाटील यांनी केला.  कार्यालयात प्रवेश दिला जात नाही तर आम्हाला विष द्या असा संतप्त सवाल उपस्थित केला. तसेच निवेदन घेण्यासाठी कार्यालयात अधिकारीच उपस्थित नसल्याने उपस्थितांनी  संताप व्यक्त करत काही वेळ गोंधळ घातला.  यानंतर व्यवस्थापक कडवे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हातीची सर्व पिके गेल्यामुळे त्याची आर्थीक परिस्थिती नाजुक झाली आहे. अतिवृष्टीचा काळात शेतकऱ्याने कोणतेही विज वापरलेला नाही. परंतू वीजबील सक्ती करून विज प्रवाह खंडीत करण्याचे काम सध्या महावितरण कंपनीकडून केले जात आहे. हा शेतकऱ्यांवर अडचणींच्या वेळेत केलेल्या अन्याय आहे. शेतकऱ्यांना अवेळी वीजपुरवठा केला जात आहे. रात्री अपरात्री शेतात शेतकऱ्यांना वावर असतो अश्या तारांमुळे त्यांच्या जीवीतास धोका आहे. सध्या खरीप पिके हाताशी आलेली नाही परंतू आता रब्बी पिक हंगाम सुरू झाला असून वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. शेतकऱ्यांना वीज पुरवठा आठ दिवसात सुरळीत न झाल्यास भाजपा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबचे निवेदन व्यवस्थापक कडवे यांना देण्यात आले. या निवेदनावर भाजपाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख लालचंद पाटील, तालुकाध्यक्ष गोपाळ इंगळे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल चौधरी, सरचिटणीस सागर घुगे, संघटक मंत्री मिलींद चौधरी यांच्यासह जळगाव तालुक्यातील शेतकरी आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1213461625832785

Protected Content