यावल, अय्यूब पटेल । येथील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी परवान्याची नुतनीकरणाची फी दोनशे रुपयावरुन पाच हजार रुपये करण्याचा ठराव सभेत सर्वानुमते मंजूर केला आहे. यामागे शेतक-यांना लुबाडणूक करणा-या व्यापा-यांना आळा बसावा तसेच बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा उद्देश असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
बाजार समिती सभापती तूषार पाटील यांनी माहीती देतांना पुढे सांगीतले की, व्यापारी असोसिएशनच्या, विनंतीनुसारच कृउबाच्या सभेने घेतलेला निर्णय एक वर्ष स्थगित ठेवत, आगामी आर्थिक वर्षापासून नूतनीकण फी वाढविण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीने व्यापारी असोसिएशनने फि वाढ विरोधात दिलेल्या पत्रकाच्या संदर्भानुसार काढण्यात आले आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी परवान्याची नूतनीकरणाची फी दोनशे रुपयावरून पाच हजार रुपये केल्याने व्यापारी असोसिएशन च्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करत नूतनीकरणाची फी पूर्ववत ठेवण्याची मागणी केली होती. अन्यथा व्यापारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यावर बाजार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकाद्वारे पत्रकारांना देण्यात आलेल्या माहीती म्हटले आहे की, अलीकडच्या काळात व्यवसाय न करणारेही नाम मात्र असलेल्या फी वर व्यापारी परवाना काढतात व नुतनीकरण ही करतात. तालुक्यात भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांकडून लाखो रुपयाचा शेतीमाल विकत घेऊन लुबाडणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे, अशा व्यापाऱ्यांना आळा बसावा व समितीचे उत्पन्नात वाढ व्हावी हाच त्या मागे उद्देश आहे. फी वाढीचा निर्णय २८ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या सभेत घेण्यात आला व सहकार विभागाकडून पोटनियमात दुरुस्तीची मान्यता घेतलेली आहे. गेल्या वर्षी कोव्हिड-१९ मुळे शेतकरी व व्यापारी अडचणीत असल्याने व्यापारी असोसिएशने सन २१-२२ मध्ये वाढ न करता त्या पुढील आर्थिक वर्षापासून करावी अशी विनंती केल्याने ती वाढ वर्षापुरती स्थगित ठेवली होती. आगामी आर्थिक वर्षापासून ही वाढ लागू करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. तथापि सध्या समितीवर काळजीवाहू संचालक मंडळ असल्याने व्यापारी असोसिएशनचा फि वाढ रद्दची विनंतीचा धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. असोसिएशनने याबाबतीत वरिष्ठ कार्यालयांकडे अपील करावे त्यांचेकडून आलेल्या आदेशास आम्ही बांधील राहू असेही पत्रकात नमूद केले आहे. पत्रकावर सभापती तुषार पाटील यांची स्वाक्षरी आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/687245112269381