मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख 52 हजार 483 जणांची तर वर्धातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी 2019 योजनेची दुसरी यादी झाली. त्यात वर्धा जिल्ह्यातील ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील १६६ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यातील १५४ शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. दुसऱ्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील ४२ हजार ९१३ शेतकऱ्यांचा समावेश असून पुढील प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद विधानसभेत आज 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.