शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी चोपडा येथे लाक्षणिक उपोषण

 

चोपडा, प्रतिनिधी ।दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व राज्य मंत्री दानवेचा निषेध करण्यासाठी अ. भा. किसान संघर्ष समन्वय समिति द्वारा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी शेतकरी नेते कॉ. अमृत महाजन, चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष के. डी. चौधरी, प्रदीप निंबा पाटील, चो. सा. का.संचालक प्रदीप पाटील, गोपाळराव सोनवणे, अश्फाक खाटीक, कॉ. छोटू पाटील, वासुदेव पाटील, वसंत पाटील, रघुनाथ कोळी, किशोर दुसाने, शांताराम पाटील, मीनाक्षी सोनवणे, अजित पाटील, सिकंदर तडवी, योगेश महाजन, अरुण पाटील, कैलास महाजन, सुरेश नागदेव, रवींद्र पाटील आदींनी सहभाग घेतला. यावेळी केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार छगन वाघ यनिवेदन देण्यात आले.

Protected Content