नवी दिल्ली । पंजाब व हरियाणातील शेतकर्यांनी आंदोलन तीव्र केले असतांना उत्तर प्रदेशातील शेतकर्यांनी मात्र चिल्ला बॉर्डरवरील रस्ता मोकळा करत केंद्र सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शविली आहे.
चिल्ला सीमेवरील आंदोलन करणारे भारतीय किसान युनियन (भानू गट) या संघटनेचे पदाधिकारी रात्री उशिरा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना जाऊ भेटले होते. यावेळी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमरदेखील होते. दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या चर्चेत चिल्ला सीमा खुली करण्यात आली. या बैठकीत १८ मागण्या ठेवण्यात आल्या. या मागण्यांमध्ये एमएसपीचा उल्लेख नाहीय. मात्र, ही शेतकरी संघटना अन्य मागण्यावरून अडून बसली आहे. दररम्यान, धरणे आंदोलन सुरु ठेवायचे की नाही याचा आज १२ वाजता निर्णय घेणार आहेत. असे असले तरीही अन्य शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर अडून आहेत. असे असले तरी शेतकर्यांच्या आंदोलनात फूट पडल्याचे आता दिसून आले आहे.
दरम्यान, दिल्ली-नोएडाच्या चिल्ला सीमेवरील आरएएफ, आरपीएफ देखील हटविण्यात आली आहे. दिल्लीच्या बाजुनेही पोलिसांच्या तुकड्या हटविण्यात आल्या आहेत. ही सीमा १२ दिवसांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुली झाली आहे.