Home Uncategorized शेखर वानखेडे यांना ‘खान्देश सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान

शेखर वानखेडे यांना ‘खान्देश सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान

0
30

सावदा, प्रतिनिधी | येथील शेखर वानखेडे यांना “खान्देश सन्मान २०२१” पुरस्कार जळगाव येथील सप्तरंग चॅनल व सरस्वती प्रतिष्ठानतर्फे ‘माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेचे सुप्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर उर्फ गुरुनाथ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

 

खान्देशातील शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता, पोलीस दल, वकीली, व्यावसायिक, वैद्यकीय व आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना शनिवार ३० ऑक्टोबर रोजी खान्देश सन्मान २०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात सामाजिक कार्यात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे शेखर वानखेडे यांना सपत्नीक “खान्देश सन्मान २०२१” पुरस्कार अभिजीत खांडकेकर यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. याप्रसंगी मुख्य आयोजक पंकज कासार, सरस्वती प्रतिष्ठानचे किरण पातोन्डेंकर, उदय पातोन्डेंकर, धनजंय विसपुते, केशवराव भामरे, किशोर आहिराव (अभिषेक ज्वेलर्स-शिंदखेडा) आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound