मुंबई प्रतिनिधी । गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी बाजारात जोरदार विक्री केल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २००० अंकांनी घसरला असून निफ्टीत ५०० अकांहून अधिक घसरण झाली आहे.

कोरोनाच्या इफेक्टमुळे शेअर बाजाराला मोठ्या प्रमाणात बसणारा फटका दीर्घ काळापर्यंत कायम राहण्याचे संकेत आता मिळाले आहेत. आज सोमवारी शेअर बाजार खुला झाल्यानंतर हेच दिसून आले. यात गुंतवणूकदारांनी प्रारंभीच बाजारात जोरदार विक्री केल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २००० अंकांनी घसरला असून निफ्टीत ५०० अकांहून अधिक घसरण झाली आहे. तसेच रुपयात देखील डॉलरच्या तुलनेत १७ पैशांची घसरण झाली आहे. येस बँकेच्या शेअरमध्ये मात्र १० टक्के वाढ झाली. अर्थ मंत्रालयाने बुधवारपासून येस बँकेवरील निर्बंध दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज येस बँकेच्या शेअरला मागणी दिसून आली.



