शेंदूर्णी (प्रतिनिधी) कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेंदूर्णीत शासनाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करत आज नगरपंचायत, आरोग्य केंद्रासह विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शेंदूर्णी नगरपंचायत
शेंदूर्णी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा विजया खलसे यांच्या हस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहात झाले. यावेळी उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल,मुख्याधिकारी साजिद पिंजारी तसेच सर्व नगरसेविका,नगरसेवक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्यासह मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र
येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रातील हुतात्मा स्मारकवर जिल्हा परिषदेच्या सदस्या सरोजिनी गरूड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विजया खलसे,उपनगराध्यक्ष चंदाबाई अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड,सागरमल जैन,माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर,माजी सरपंच प्रभाकर सपकाळ, माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल सर्व नगरपंचायत नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम सर्व नागरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
अप्पासाहेब र.भा. गरूड महाविद्यालय,गजाननराव गरूड माध्यमिक विद्यालय
येथील अप्पासाहेब र.भा. गरूड महाविद्यालय,गजाननराव गरूड माध्यमिक विद्यालय, येथे संस्थेचे अध्यक्ष संजय गरूड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.वासुदेव पाटील,प्राचार्य डी.आर. शिंपी यांचेसह प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोना विषाणू संसर्गाचा यशस्वी सामना करून परत आलेल्या महाविद्यालयीन कर्मचारी पंकज जैन यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
स्व.रा.ल.ललवाणी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च विद्यालय
येथील स्व.रा.ल.ललवाणी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च विद्यालयात मुख्याध्यापक प्रमोद खलचे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सरस्वती विद्यामंदीर व श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय येथे डॉ हेडगेवार शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष डॉ.कौमोदी साने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राजू पाटील, मुख्याध्यापिका शिला पाटील,सर्व शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते.