शेंदूर्णी येथे नवीन जलकुंभाचे भूमिपूजन

शेंदूर्णी प्रतिनिधी । शेंदुर्णी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सोयगाव रोडवरील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ नवीन ५ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले.

शेदुर्णी येथे गेल्या ५० वर्षापासून ५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी होती ती अतिशय जीर्ण झालेली असल्याने त्या टाकीत पाणी भरता येत नाही नगरपंचायत कडे सद्या ८ लाख लिटर क्षमतेच्या २ पाण्याचा टाक्या असल्यातरी गावात पाणीपुरवठा करतांना ८ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो नवीन टाकीच्या बांधकामांमुळे साठवण क्षमता वाढून पाणीपुरवठा ३, ४ दिवसांनी करता येईल मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी नागरीकांनी केलेल्या सूचना स्वीकारून पारदर्शक नगरपंचायत कारभार व गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

अमृत खलसे, गोविंद अग्रवाल यांनी आपल्या भाषणातून असे सांगितले, की पाणी फिल्टर प्लांट चालू झाल्यावर गावांत शुध्द पाणीपुरवठा करता येईल. नगरपंचायतने मूलभूत सुविधा पुरवितांनाच पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही जबाबदारी कटाक्षाने निभावली पाहिजे अशी मागणी उत्तम थोरात यांनी आपल्या भाषणात  केली. नगरसेवक निलेश थोरात यांनी आभार मानले.

 

सोयगाव रोडवरील जुन्या पाण्याच्या टाकीजवल नवीन ५ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विजया अमृत खलसे तर प्रमुख उपस्थितीतांमध्ये नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी, नगरसेविका साधना बारी, भावना जैन, नगरसेवक निलेश थोरात, गणेश जोहरे, शरद बारी, राहुल धनगर, भाजपचे जेष्ठ नेते गोविंद अग्रवाल, उत्तम थोरात, अमृत खलसे, नारायण गुजर, शंकर बारी, योगेश बारी इत्यादी उपस्थित होते.

Protected Content