शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी । प्रती पंढरपूर शेंदूर्णी नगरीत आज संत श्रेष्ठ कडोजी महाराज यांनी सुरू केलेला २७७ वा रथोत्सव यावर्षी मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
यावेळी शेंदुर्णी नगरपंचायत नगराध्यक्ष विजया खलसे व पती अमृत खलसे व शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद व शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या संचालिका उज्वला काशीद यांच्याहस्ते रथाची पूजा करण्यात आली. यावेळी संत कडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड, संत श्रेष्ठ कडोजी महाराज यांच्या गादी वारस ह.भ.प. शांताराम महाराज भगत, भाजप नेते गोविंद अग्रवाल, माजी सरपंच सागरमल जैन, शांताराम गुजर, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, सर्व मानकरी भालदार, चोपदार आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रथोत्सवात कोरोना नियमांचे पालन करून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बाहेर गावाहून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे यांच्या सह पहूर पोलिस स्टेशनचे ए.पी.आय. अरुण धनवटे व पीएसआय मोहिते यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.