शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात धी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑफ .सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी या संस्थेचा ७७वा संस्था वर्धापन दिन व दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, संस्थेचे सचिव सतीश काशीद ,संस्थेच्या संचालिका उज्वला काशीद, ज्येष्ठ संचालक सागरमल जैन, संचालक यु यु पाटील, ह.भ.प. शांताराम महाराज, ह.भ.प. सकट महाराज, महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर. पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी. उदार, डॉ. भगवान बैरागी, मनोज झंवर उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. पी. उदार यांनी संस्थेविषयी आपल्या प्रास्ताविकातून माहिती सांगितली .तसेच एस .एस .सी. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक वैशाली मनोज झंवर, द्वितीय क्रमांक यश भगवान बैरागी, तृतीय क्रमांक शिवानी गजानन पाटील, चतुर्थ क्रमांक प्रियंका शिवाजी बाविस्कर, आणि आकांक्षा भगवान बारी, पाचवा क्रमांक गायत्री रवींद्र उंटवाले या विद्यार्थ्यांनी पटकावला.तसेच महाविद्यालयातील बी.कॉम. च्या वर्गातील कुमारी भारती श्रावण सूर्यवंशी या विद्यार्थिनीने डबल गोल्ड मेडल मिळवले .गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चेअरमन संजय राव गरुड, सचिव सतीश काशीद ,संचालिका उज्वलाताई काशीद, ज्येष्ठ संचालक सागरमल जैन यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
संस्थेच्या वतीने ह.भ.प. कडोजी महाराज संस्थानास ज्येष्ठ कलाशिक्षक जी टी कुमावत व डी एच बारी यांनी निर्मित केलेली कडोजी महाराज यांचे तैलचित्र प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली. संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. मान्यवरांच्या मनोगतात मध्ये संस्थेचे ज्येष्ठ संचालक सागरमल जैन यांनी संस्थेचा इतिहास संस्थेची वाटचाल याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. संस्थेचे सचिव सतीश काशीद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, संस्थेचा विकास अधिकाअधिक होण्यासाठी शिक्षक बंधू ,सर्व कर्मचारी, संस्थेमधील संचालक मंडळ यांनी अधिक मेहनत घेण्या संबंधी मार्गदर्शक सूचना केल्या. अध्यक्षीय भाषण करताना, संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड संस्था शाळा अजय-अमर आहेत, यातील सर्व घटकांनी हातात हात घालून एकमेकांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे आहे, तसेच यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शेंदुर्णी शाळेतील भाऊसाहेब सूर्यवंशी बापू यांनी संस्थेला ५ हजार रूपयांची रुपये देणगी दिली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सहसचिव दीपक गरुड व वस्तीग्रह सचिव कैलास देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमासाठी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर ,विद्यालयाचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य ,विद्यालयाचे उपमुख्याध्यापक महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षक बंधू-भगिनी ,शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी, पालक वर्ग व पत्रकार बंधु उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक पी.जी.पाटील सर व आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपशिक्षक डी. बी. पाटील सर यांनी केले.