शेंदूर्णी, प्रतिनिधी | येथिल अप्पासाहेब र. भा. गरुड महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर शिक्षणसाठी केंद्र उपलब्ध झाले आहे.
अप्पासाहेब र. भा. गरुड महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत अर्थशास्त्र, हिंदी, मराठी , इंग्रजी एमबीए, या विषयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठचे अभ्यास सुविधा केंद्र उपलब्ध झाले आहे. परिसरातील गरजू आणि उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्या तसेच गृहिणी ,नोकरदार,व्यापारी, विद्यार्थ्यांना या सुविधांचा लाभ घ्यावा असे आव्हान केंद्रातर्फे करण्यात आले आहे, यासाठी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतिष काशीद यांनी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू इ.वायूनंदन, विद्यार्थी सेवा विभाग संचालक प्रकाश देशमुख, नाशिक विभागीय संचालक डॉ. धनंजय माने यांचे विशेष आभार मानले आहे.