शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील धन निरंकार शाखेतर्फे हालाकीच्या परिस्थितीत जगत असलेल्या परीवारास जीवनावश्यक वस्तू, अन्नदान आणि शिधाचे वाटप करण्यात आले.
सतगुरू माता सुदिक्षा सविंदर हरदेव महाराज यांच्या आदेशान्वये धुळे झोनचे प्रमुख हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील धन निरंकार शाखेच्या वतीने आर्थिक परिस्थिती दुर्बल असलेल्या परीवारांना जीवनावश्यक वस्तू, अन्नदान आणि शिधाचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी शाखेचे विश्वनाथ ओव्हाळे, अमृत महाराज, मुकेश ओव्हाळ, आबा पाटील, नितीन महाराज, शाखेचे मुखी महात्मा गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर मुखी प्रल्हाद महाराज व सेवादलाचे रतनसिंग परदेशी यांनी गावातील पांडे नगर, परकोट गल्ली बाहेरपुरा या ठिकाणी गरजूंना वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००