शेंदुर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील एक व्यापार्याचा कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला असून त्याचा रहिवास असणारा परिसर प्रशासनातर्फे सील करण्यात आला आहे.
येथील मुख्य बाजार पेठेत दुकान असलेल्या व्यापार्याला जळगाव येथिल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्या पाच दिवसापासून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेव्हा कोरोना संशयित म्हणून त्याचा स्वॅब तपासणी साठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्याच्या निकटच्या संपर्कात आलेल्या परिवारातील पत्नी, मुलगी व भाचा यांना पहुर येथिल कोविड केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले असून दूरच्या संपर्कातील आठ व्यक्ती होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण राहत असलेला परिसर शेंदूर्णी नगरपंचायत कडून सॅनिटाइज करून परिसर सील करण्यात आला आहे. तर, शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.