शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी)। नुकताच बारावीच्या निकालात विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गरूड महाविद्यालयात गुणगौरव सोहळा सोशल डिस्टन्सिंग राखत मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
बारावी कला शाखेतून प्रथम क्रमांक जाधव स्वप्नील युवराज ७४.६१ टक्के, द्वितीय स्नेहा गणेश वारुळे ७१.२३ टक्के, स्नेहा हीने अत्यंत गरीब परिस्थिती हे यश संपादन केले म्हणून तिला प्रा. अमर जावळे यांच्याकडून ३ हजार तर संजय गरुड यांनी ५०० रूपये रोख बक्षीस देण्यात आले, तर तृतीय दीपाली संजय उशीर ६८.१५टक्के तर वाणिज्य शाखेतून प्रथम शेजल कमलेश चव्हाण ८१.०७ टक्के, द्वितीय रवींद्र पाटील दिग्विजय ७९.८४ टक्के दिग्विजय हा उपप्राचार्य आर.जी.पाटील यांचा पुतण्या आहे. तृतीय अंजली भास्कर हटकर ७५.५९ टक्के गुण प्राप्त केले. या सर्व गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला अक्षय अनिल परदेशी याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ग्रुप डी परीक्षेत महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक पटकावला. याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयातील प्रा.महेश पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून त्यांच्या संशोधन कार्यासाठी पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड यांनी सत्कार केला. दीपक धोबी या विद्यार्थ्यांला पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव सगरमल जैन, संचालक सदस्य यु.यु.पाटील, सहसचिव दिपक गरुड, चेअरमन संजय देशमुख यांनीही गुणवंतांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रमोद सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.निरुपमा वानखेडे यांनी केले. या ठिकाणी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मास्क वापरून व सोशियल डिस्टन्स ठेऊन उपस्थिती लावली होती.