मुंबई : वृत्तसंस्था । रश्मी शुक्ला यांनी परवानगी घेऊन राजकीय नेत्यांचे फोन टॅप केले होते तर त्यांनी त्या काळातील मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
रश्मी शुक्लांच्या वकीलांनी कोर्टात शासकीय परवानगी घेऊन फोन टॅप केल्याचे सांगितले आहे. मात्र फोन टॅप दिशाभूल करुन परवानगी घेण्यात आली आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
नेत्यांचे फोन टॅप करण्यासाठी रश्मी शुक्ला यांनी राजद्रोह, देशद्रोह या नावाखाली परवानग्या घेतल्या होत्या असेही नवाब मलिक म्हणाले.
पुण्याच्या सीपी असताना त्या काळातील खासदार, नेते असतील यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आधीपासूनच आरोप आहे. ज्यापध्दतीने त्या त्यांची ट्रान्स्फर झालेली सांगत आहेत मात्र त्यांची ट्रान्स्फर झालेली नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले