शिव जयंतीनिमित्त युवासेनेतर्फे दोन दिवसीय लसीकरण शिबिरास प्रारंभ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवासेना जळगाव महानगरतर्फे नेहरू चौक येथे दोन दिवसीय लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

लसीकरण शिबिराचे उदघाटन शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महापौर जयश्री महाजन, नितीन लढ्ढा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराज पाटील, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, शोभा चौधरी, सरिता कोल्हे, ज्योती शिवदे, मानसिंग सोनवणे, मनोज चौधरी, गणेश गायकवाड, प्रशांत सुरळकर, मतीन सय्यद आदी उपस्थतीत होते. पहिल्या दिवशी १२ ते १४ वयोगातील १०५ तर १५ पुढील वयोगातील १०२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी यशश्री वाघ, वैष्णवी खैरनार, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे, गिरीश सपकाळे, यश सपकाळे, चेतन कापसे, यश लोढा, उमाकांत जाधव, अभिजित रंधे, विशाल वाणी, कुलभूषण पाटील, राधेशाम कोगटा, प्रशांत नाईक, सागर हिवराळे, हितेश ठाकरे, अमोल मोरे, तेजस दुसाने, यश सोनवणे आदींनी कामकाज पहिले.

Protected Content