जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून गाडी घेण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २७ मे रोजी दुपारी १२ वाजता सासरच्या मंडळींनी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर हुडको परिसरातील माहेर असलेल्या सानियाबी शहजाद शहा (वय-२०) यांचा विवाह रावेर तालुक्यातील रसलपुर येथील शहजाद शहा सलीम शहा यांच्याशी फेब्रुवारी २०२२ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर सुरुवातीचे ६ महिने चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला माहेरहून गाडी घेण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला मारहाण केली, त्यामुळे तिचा गर्भपात झाला तसेच टोचून बोलणे शिवीगाळ करणे आणि जीवेठार मारण्याची धमकी सासू-सासरे यांच्याकडून मिळत होती. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. यानंतर शनिवारी २७ मे रोजी दुपारी १२ बारा वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती शहजाद शहा सलीम शहा, सासू बिलकिसबी सलीम शहा, सासरे सलीम शहा, ननंद रेश्मा बी, यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.




