जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर परिसरातील ४२ वर्षीय विवाहिता घरात कोणालाही काहीही न सांगता २० डिसेंबर रोजी दुपारपासून बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, वंदना संजय कळसकर (वय-४२) रा. हरी ओम नगर, कानळदा रोड, जळगाव ह्या पती, मुलगा आणि सुन यांच्यासोबत राहतात. राहते घर हे दोन मजली असल्यामुळे वरच्या घरात मोठा मुलगा राहतो तर खाली वंदना कळसकर ह्या पतीसह राहतात. २० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पती संजय कळसकर हे कामाच्या निमित्ताने बाहेर गेले तर मुलगा योगेश वरच्या घरात जेवण करत होता. दरम्यान वंदना कळसकर ह्या घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेल्या. सायंकाळ पर्यंत त्या घरी आल्या नाही म्हणून मुलगा योगेशने वडीलांना फोन करून माहिती दिली. रात्री उशीरापर्यंत विवाहितेचा शोध घेवून मिळून न आल्याने आज शहर पोलीसांना माहिती दिली. मुलगा योगेश कळसकर यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.