जळगाव प्रतिनिधी । महानगरपालिकेचे शिवाजी नगरात असलेल्या रूग्णालयात प्रसूतीगृह पुन्हा सुरू करावी अशी मागणीचे निवेदन ‘धर्मरथ फाऊंडेशन’तर्फे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील काही भागातील बरेच गोर-गरीब महिला शिवाजीनगर येथील मनपा रुग्णालयात प्रसुतीसाठी येत असतात. परंतु काही दिवसांपासून येथील प्रसुतीगृह काही कारणास्तव बंद करण्यात आले आहे. शिवाजीनगर व आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या बघता जवळपास १ लाखाच्या जवळपास आहे. एवढ्या मोठ्या प्रभागांमध्ये महापालिकेचे हे एकमेव रुग्णालय आहे. या महापालिका रुग्णालयात फक्त प्रभागातूनच नव्हे तर ग्रामीण भागातील काही महिला भगिनी सुद्धा प्रसुतीसाठी दाखल होतात. लॉकडाउनच्या काळात मनपा रुग्णालयातील पुरेशा स्टाफच्या अभावी रुग्णालयातील प्रसूतिगृह बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रसूतीच्यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाजीनगरातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे याविषयाबाबत पाठपुरावा करत आहे. मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तरी जिल्हाधिकारी यांनी निवेदनाचा विचार करून मनपा रूग्णालयातील प्रसुतीगृह पुन्हा सुरू करावी. कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात या गर्भवती महिलांचा किंवा त्यांच्या पोटातील अर्भकांचा जीव जाऊ नये इतकेच. असे नमूद केले आहे.
निवेदन देतांना धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, प्रकाशभाऊ मुळीक, मिलिंद बडगुजर आणि शिवाजी नगरातील इतर नागरीक उपस्थित होते.