जळगाव, प्रतिनिधी | शिवाजीनगर पुलाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या पुला संदर्भातील माहिती संबधित ठिकाणी लावण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, शहरातील शिवाजीनगर येथील पुलाचे सार्वजिनक बांधकाम विभागामार्फत बांधकाम सुरु आहे. या संबधित पुलाचे इस्टीमेंट, मंजूरी, मंजूर निधी, ठेकेदाराचे नाव तसेच मंजूर नकाशा, किती दिवसात पूर्ण होऊन लोकांना वापरता येईल. तसेच हा पूल कशा पद्धतीने तयार होऊन कशा आकाराचा तयार होत आहे यासंदर्भातील माहिती असलेले फलक त्या ठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी युवक अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, प्रताप बनसोडे , अनिल लोंढे, भीमराव सोनावणे आदी उपस्थित होते.