जळगाव प्रतिनिधी राहूल शिरसाळे । उद्या होणार्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आज शिवसेनेतर्फे अनुक्रमे जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी सुरू असून या पार्श्वभूमिवर आज महापौरपदासाठी जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदासाठी कुलभूषण पाटील यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. याप्रसंगी दोन्ही उमेदवारांसह शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी महापौर ललीत कोल्हे, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर राखी सोनवणे, अनंत जोशी, नितीन बरडे, अमर जैन, विराज कावडिया आदींची उपस्थिती होती.
https://www.facebook.com/508992935887325/videos/140461617988466