जळगाव, प्रतिनिधी । शिवसेनेच्या कायदे विषयक आघाडीच्या महानगर प्रमुखपदी येथील प्रसिद्ध वकील राजेश पावसे यांची नियुक्ती करण्यात आली.
राजेश पावसे यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमधे सक्रिय सहभाग असतो म्हणून त्यांना शिवसेनेच्या कायदे विषयक आघाडीच्या महानगर प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अँड पावसे यांना निवडीचे नियुक्ती पत्र नुकतेच त्यांना माजी महापौर नितीन लद्ढा याच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी महानगर प्रमुख शरद तायडे, महानगर संघटक दिनेश जगताप, महिला महानगर प्रमुख शोभा चौधरी, निलेश देशमख, पूनम राजपूत, बाळा कंखरे, विवेक चौधरी आदी उपस्थीत होते. त्यांच्या निवडी बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, माजी महापौर विष्णु भंगाळे यांसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.