शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

मुंबई, वृत्तसेवा |  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिआ झाला असून त्यांची प्रकृती खालावली असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली.

 

गेल्या तीन दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे हे घरात पाय घसरून पडल्याने जखमी झाले होते. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातच त्यांना  न्यूमोनिआ झाला असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. वार्धक्यामुळे ते उपचारालाही प्रतिसाद देत नसून त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार करत आहेत.

 

त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे बाबासाहेब पुरंदरे यांचा मुलगा अमृत पुरंदरे यांनी सांगितले.  बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता.

Protected Content