पाचोरा, प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत . त्यांची जयंती साजरी करणे हा गुन्हा कसा काय ठरू शकतो ? आणि तो जर गुन्हा असेल तर असे हजारो गुन्हे मी स्वतःवर घेण्यास तयार आहे , असे भाजप तालुकाध्यक्ष अमोल षीने यांनी म्हटले आहे
भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध भागातील शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यास गेले असता शेकडो तरुण शिवप्रेमींनी शिवजन्मोत्सवात सहभाग घेण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह १९ शिवप्रेमींवर कलम २६९, २७०, १८८,३७ (१) (सी),१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल शिंदे पुढे म्हणाले कि , छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्यास मी पुष्पहार अर्पण करण्यास गेलो असता पोलीस प्रशासनाने राजकीय दबावापोटी माझ्यासह अनेक शिवप्रेमींनवर गुन्हे दाखल केले आहेत. दडपशाही पद्धतीने कारवाई करणाऱ्या शिवद्रोही ठाकरे सरकारचा मी निषेध करतो शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त मते मागण्यासाठी वापर करत असते आपले आमदार सत्ताधारी असुन मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे आहेत. त्यांनी तालुक्यातील शिवप्रेमींच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांना निर्णय घेण्यासाठी विनंती करायला हवी होती.
आमदारांना महाराजांच्या बाबतीत थोडीही आस्था असती तर त्यांनी निदान कालचा दिवस तरी राजकारण बाजुला ठेऊन पोलीस प्रशासनावर दबाव आणून गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले नसते असा थेट आमदारांवर आरोप अमोल शिंदे यांनी केला शिवजन्मोत्सव साजरा करून मी कुठलाही गुन्हा केलेला नाही त्यामुळे सरकारला काय कारवाई करायची ती करू द्या तसेच माझ्यासह ज्या शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये असे त्यांनी सांगितले.