शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे निषेध (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यात विविध पक्षांच्या माध्यमातून, चित्रपटातून तसेच साहित्यातून  अवमान करण्यात येत असून या प्रवृत्तीचा शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला आहे.

 

 

राज्यात काही पक्षांच्या नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा  अवमान करण्यात येत आहे. याबाबत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यांनी महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीस शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने पाठींबा जाहीर केला आहे. तसेच सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली छत्रपतींचा अवमान करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट बनवितांना सेन्सॉर बोर्ड येथे इतिहास अभ्यासक शिष्टमंडळ नेमण्यात यावे. तसेच अशाप्रकारचे चित्रपट बनवितांना छत्रपती उदयनराजे भोसले यांची परवानगी सक्तीची करण्यात यावी. आदी मागण्या शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेतर्फे करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा येथे त्यांचा अवमान करणाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा प्रमुख गजानन माळी, अशोक शिंदे, राज परदेशी, कल्पेश निकुंभ, संतोष पाटील, नरेंद्र सोनवणे, पंकज कोळी, योगेश साळुंखे, रवींद्र बिऱ्हाडे, राहुल चौधरी आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content