भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील शिवपूर कन्हाळा शिवारात बेकायदेशीर देशी हातभट्टीची दारू तयार करतांना भुसावळ ग्रामीण पोलीसांनी कारवाई केली असून ५१ हजार रूपयांची दारू नष्ट केली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शिवपूर कन्हाळा शिवारात प्रल्हाद टाक यांच्या शेतात बेकायदेशीर गावठी हातभट्टी लावून दारू बनवित असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी माहितीची दखल घेत शेतात जावून दुपारी १२ वाजेच्या सुमारास फिरोज छट्टू गवळी हा महू नवसागर गूळे मिश्रीत रसायन बागळगून जळत्या भट्टीवर दारू तयार करत असतांना रसायने ८ ड्रममध्ये १५०० लिटर आणि हातभट्टी २५ लिटर तयार दारू असे अंदाजे ५१ हजार रूपयांची दारू मिळून आली. याप्रकरणी ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार, स.फौ. सुनिल चौधरी, पोहेकॉ अजय माळी, विठ्ठल फुसे, संजिव मोंढे, प्रविण पाटील, पो.ना. विजय पोहेकर यांनी कारवाई केली.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००