भुसावळ, प्रतिनिधी । कन्हाळा येथील गावठी दारू बनवीणाऱ्या हातभट्टीवर तालुका पोलिसांनी कारवाई करीत सुमारे ६०० लिटर गावठी दारूचे कच्चे रसायन नष्ट केले.
शिवपुर कन्हाळा येथे शुक्रवार २८ रोजी सायंकाळी येथील बिरूबाई शेकू गवळी या महिलेच्या घराजवळ ६०० लिटर गावठी दारूचे कच्चे रसायन सुमारे १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जागेवरच नष्ट करीत कारवाई केली. या कार्रवाईत पोलिस निरीक्षक कुंभार यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, विठ्ठल फुसे, नितीन सपकाळे, हवालदार संगीता निळे, रियाजुद्दीन काझी यांनी ही कारवाई केली.याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात बिरुबाई गवळी यामहिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान संशयित महिला फरार झाली आहे .