Home धर्म-समाज शिवजयंतीनिमित्त भव्य शिवपालखी सोहळा उत्साहात

शिवजयंतीनिमित्त भव्य शिवपालखी सोहळा उत्साहात


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य शिव पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या पालखी सोहळ्यात ठिकठिकाणी रांगोळी काढून प्रत्येक घरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय या घोषणेने तसेच टाळ, मृदुंग, विना, संबळ या तालावर अनेकांनी ठेका धरला. तसेच पालखी सोहळ्याला प्रारंभ राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेपासून सुरुवात करण्यात आली. समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा प्रतिमेचे करण्यात आला. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. त्याप्रसंगी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ गावकरी मंडळी सर्व समाज बांधव महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

उचंदा ग्रामपंचायत कार्यालय
ग्रामपंचायत कार्यालय उचंदा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुजन लोकनियुक्त सरपंच वंदना दीपक भोलाणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

उचंदा येथे भव्य रक्तदान शिबिर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उचंदा येथील हनुमान मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये तरुण मंडळींनी मोठा सहभाग घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदान केले आहे.


Protected Content

Play sound