जळगाव प्रतिनिधी । कोरोना संकटकाळात नागरिकांच्या मदतीला धावणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक, समाजसेवक, शिक्षक यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शिवकॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिरात कोरोनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कोरोना महामारीत डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक, समाजसेवक, शिक्षक यांचासह कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे कार्य कौतुकास्पद असे स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष तथा ग.स.अध्यक्ष मनोज पाटील यांनी गौरवउद्गार काढले. डॉ. महेंद्र काबरा यांनी कोरोना बाबत सविस्तर माहिती देत नियमित व्यायाम व रोजच्या आहारात पौष्टीक,सकस आहार बाबत सांगितले.
या सन्मान सोहळ्यात यांचा झाला सन्मान
भारती रविंद्र काळे, राकेश मनोहर कंडारे, डॉ.स्वाती सोनवणे, हर्षाली राजीव पाटील, डॉ. नलिनी महाजन, प्रतीक्षा मनोज पाटील, प्रिया बुरकुडे, भारती केशव म्हस्के, अतुल पाटील, वर्षा पाटील, ज्योती राणे, सुवर्णलता अडकमोल, डॉ.सौ.सोनाली राहुल महाजन, विशाल शर्मा, डॉ. शरीफ शेख बागवान, निशा पवार, किरण कोळी, धनश्री पाटील, दक्षता पाटील, शगफ शेख, आदिल शेख जिनल जैन, उज्ज्वला टोकेकर, ऍड.अभिजित रंधे यांना कोरोनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वामी समर्थ ग्रुपचे अध्यक्ष तथा ग.स.अध्यक्ष मनोज पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून काबरा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ महेंद्र काबरा, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक वासुदेव पाटील, स्वामी समर्थ ग्रुपच्या संचालिका प्रतीक्षा पाटील,सुर्या फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना सुर्यवंशी, पत्रकार पल्लवी भोगे, कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी, पंकज कासार, मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख, सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे आदी उपस्थित होते. सरस्वती विद्या मंदिर शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.