जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी परिसरात ८० वर्षीय वयोवृध्द महिला चक्कर येवून पायरीवरून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शेवंताबाई श्रावण महाजन (वय-८०) रा. हनुमान नगर, धरणगाव ह्या घरात कोणाला काहीही न सांगता २ ऑगस्टपासून निघाल्या होत्या. जळगावातील शिवकॉलनी स्टॉप परिसरात अनोळखी म्हणून फिरत होत्या. ६ ऑगस्ट रोजी शिवकॉलनीतल्या रिक्षा स्टॉपसमोरील एका दुकानावर बसल्या होत्या. त्यांना चक्कर आल्याने त्या पाचव्या पायरीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सुरूवातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात अनोळखी म्हणून नोंद करण्यात आली होती. दरम्यान, वृध्देजवळील कागदपत्राच्या आधारे आज सकाळी नातेवाईकांकडून ओळख पटली. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात शवविच्छेन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. प्राथमिक तपास हे.कॉ. सतिष डोलारे करीत आहे.