जळगाव प्रतिनिधी । टमाट्याने भरलेला ट्रक जळगावात येत असतांना मध्यरात्री चार जणांनी रस्त्यावर दुचाकी आडवी लावून चालकासह क्लिनरला मारहाण करून ताब्यातील रोख रक्कम हिसकावून घेतल्याची घटना शिरसोली रोडवर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर बिसन शिसे रा. कन्नड यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक (एमएच २० डीई ३३४९) वर चालक विकास सुरेश गायके (वय-२१) रा. कनकौतीनगर, कन्नड, औरंगाबाद म्हणून काम करतात. ९ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास गावातील शेतकऱ्याचे टमाटे घेवून जळगाव येथे विक्री करण्यासाठी ट्रकने निघाले. त्यावेळी सोबत क्लिनर अजय (पुर्ण नाव माहिती नाही) होता. रात्री १२.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कृष्णा लॉन्स मंगल कार्यालयाजवळ रोडवर अज्ञात चार व्यक्तींनी दुचाकी आडवून ट्रक थांबविला. यातील एकाने ट्रक चालक विकास आणि क्लिनर अजय यांना मारहाण करून दोघांकडून ६०० रूपये रोख काढून घेतले. तसेच एकाने चाकू दाखवून कोणाला सांगितले तर पाहून घेवू असा दम दिला. पुढे आल्यानंतर डीमार्ट जवळ रात्रीला गस्त असलेले पोलीसांना सदरील घटना सांगितल्यानंतर पो.कॉ. निलेश पाटील. पो.कॉ असिम तडवी यांनी घटनास्थळी पोहचले त्यावेळी तीन जण उभे होते. पोलीसांना पाहताच त्यांनी तेथून दुचाकी (एमएच १९ डीके ६४३२) पळ काढला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.