Home Cities जळगाव शिरसोली येथे गरजुंना किराणा साहित्याचे वाटप

शिरसोली येथे गरजुंना किराणा साहित्याचे वाटप


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथे कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून त्यांना काहीतरी मदत व्हावी, हि सामाजिक बांधिलकी म्हणून भरारी फाउंडेशन आणि वर्धिष्णू सोशल रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे आज १७ एप्रिल रोजी सकाळी गरजुंना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

या किराणा साहित्यामध्ये गहूचे पीठ, तांदूळ, डाळ, बेसन, तेल आदी जीवनावश्य्क वस्तूंचा समावेश होता. यावेळी भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष अद्वैत दंडवते, भरारीचे गोपाळ कापडणे , माजी उप सरपंच शेनफडू पाटील, भगवान सोनार, बापू मराठे, अकील मेंबर, नाना हवलदार, प्रकाश मराठे, चंदू काळे, संजय सुर्यवंशी, सुनिल माळी, आबा सोनार आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound