शिरसोली येथील एकाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसोली येथील ५० वर्षीय व्यक्तीने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय नारायण मिस्त्री (वय ५०) रा. शिरसोली ता. जि.जळगाव हे वेल्डिंग मिस्तरी चे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबीयांसह जेवण करून ते वेल्डिंगच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन झोपले. दरम्यान, मध्यरात्री त्यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी त्यांचा लहान मुलगा नितीन हा पाणी तापवण्यासाठी हिटर लावण्यासाठी गेला असता हा प्रकार लक्षात आला. दरम्यान, आत्महत्या केल्याचे उघड झाल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी सविता व राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

Protected Content