जळगाव : प्रतिनिधी । हनुमान हे शक्तीपीठ असून तरूणांनी बलोपासना करून स्वच्छतेला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. शिरसोली येथे आज श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या जीर्णोध्दारानंतरच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात ते बोलत होते.
शिरसोली प्र.न. येथील श्रीकृष्ण मंदिराने उभारलेल्या इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक दात्यांनी मदत केली यातून मंदिराचा जीर्णोध्दार करण्यात आला आज ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी श्रीकृष्ण मंदिरातर्फे पालकमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, शिरसोली प्र.न. आणि शिरसोली प्र.बो. ही दोन्ही गावे जळगाव तालुक्यातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतीकदृष्ट्या महत्वाची आहेत. तालुक्याच्या राजकारणात या गावाची महत्वाची भूमिका आहे. गावाच्या विकासासाठी आपण पुढाकार घेतला आहे. प्रामुख्याने शिरसोली प्र. न. गावासाठी दोन कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा जल मिशन योजनेत समावेश केला तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले या कामाला चालना मिळाली आहे. शिरसोली प्र.न.च्या ग्राम सचिवालयासाठी २५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला याची निविदा निघालेली आहे. येथे फर्निचरसह अद्ययावत ग्राम सचिवालय उभारण्यात येणार आहे. दोन्ही गावांच्या विकासासाठी आपण निधीचा कमतरता भासू देणार नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केले.
ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, यंदा हवा तितका पाऊस झालेला नाही. यामुळे इच्छापूर्ती हनुमान मंदिरात नतमस्तक होऊन सर्वत्र धो-धो पाऊस पडून आबादानी व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी असे आवाहनदेखील ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
याप्रसंगी पं. स. माजी सभापती नंदलाल पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , सरपंच प्रदीप पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष रमेश पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, रामकृष्ण काटोले, शेख रहीम भाई, मुरलीधर ढेंगळे, शेणफडू पाटील, श्रावण ताडे, श्रीकृष्ण मित्र मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मराठे, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, माधव साबळे, देवेंद्र सोनवणे, विनोद मराठे व निबा पाटील, उमाजी बानगळे, दयाराम धामणे, देवचंद खैरे, देविदास साबळे यांच्यासह शिरसोली व परिसरातील महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदीर उभारणीसाठी देणगी देणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ मराठे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार अर्जुन पाटील मानले.