यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाड येथून पायदिंडी जाणाऱ्या वारेकरींचे माजी उपसरपंच धनंजय पाटील यांच्या निवासस्थानी आगमन झाल्याने त्यांच्या उपस्थितीत शोभायात्रा व प्रसादाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
तालुक्यातील शिरसाड येथून श्री.क्षेत्र किनगाव ते श्री क्षेत्र मेहुण श्रीसंत मुक्ताई पायी दिंडींचे गुरूवारी दुपारी १२ वाजता माजी उपसरपंच धनंजय एकनाथ पाटील यांच्या निवासस्थानी आगमण झाले. यावेळी परिसरातील भाविकांनी दिंडीचे दर्शन घेतले व नंतर शिरसाड गावात दिंडींची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ह.भ.प.आबा पाटील माचलेकर महाराज यांचे प्रवचण झाले. या भक्तीभावाच्या वातावरणात दिंडींतील वारक-यांचे स्वागत शिरसाड ग्रामपंचायतचे माजी उप सरपंच धनंजय एकनाथ पाटील, पत्रकार तथा सामाजीक कार्यकर्ते राजेंन्द्र एकनाथ पाटील, तेजस धनंजय पाटील, धिरज राजेंन्द्र पाटील यांनी केले.
यावेळी ह.भ.प.भिकन शामराव पाटील, ह.भ.प.लिलाधर महाराज, ह.भ.प.किरण शामकांत पाटील, सामाजीक कार्येकर्ते डाँ.योगेश पालवे, किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव मनिष विजयकुमार पाटील, योगेश पाटील, प्रकाश पाटील, ह.भ.प.कैलास महाराज (किनगाव) ह.भ.प.बापू महाराज लासुरकर यांच्यासह महिला, पुरूष व शिरसाड ग्रामस्थ पायी दिंडीत उपस्थीत होते. शिरसाड तालुका यावल येथुन महाप्रसादाच्या कार्येक्रमानंतर दुपारी ३ वाजता श्रीव्यास मंदीर यावलकडे वारकरी सह पायीदिंडी मार्गस्थ झाली.