शिक्षण सभापतींच्या मध्यस्थीने शैक्षणिक शुल्क वसुलीच्या वादात तोडगा(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील ओरीऑन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचाप्रकार काल गुरुवारी उघडकीस आला होता. याची दखल घेत आज जि. प. शिक्षण सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी शाळेस भेट देवून पालक व शाळेची बाजू एकून घेत मध्यम मार्ग काढल्याने पालक व शाळा प्रशासनाने त्यांचे आभार मानले. 

 

ओरीअन शाळेतील काही पाल्यांचे पालकांनी शिक्षण सभापती यांचे कार्यलय गाठत आपली व्यथा माडंली. फी न भरल्यामुळे त्यांच्या पाल्यांना परीक्षेला बसू दिले जात नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. हे समजताच शिक्षण सभापती रवींद्र पाटील व उपशिक्षणाधिकारी राजेंद्र सपकाळे यांनी त्या पालकांसह शाळा गाठली. त्यांनी प्रिन्सिपॉल ब्रूस हॅण्डरसन यांना मुलांना शिक्षणापासून वंचित का ठेवण्यात येत आहे? याची विचारणा केली. काही पालकांकडे दोन तर काही पालकांकडे एक वर्षाची फी बाकी आहे. फी मधील ठराविक रक्कम भरल्यानंतर विद्यार्थांना पेपर लिहू शकतील. यावर मुलांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याने शाळेला नोटीस बजविण्यात येणार असल्याचे शिक्षण सभापतींनी स्पष्ट केले. 

शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याला ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू नये अशा सूचना शिक्षण विभागाने काढलेले असतांना विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला. यावेळी महाराष्ट्र स्टूडेंट युनियनची संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कोरोना  काळामुळे आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने आम्ही फी भरू शकत नसल्याचा दावा करत पालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू द्यावे अशी विनंती केली. प्रिन्सिपॉल  ब्रूस हॅण्डरसन यांनी शाळेला फी न भरल्यामुळे काय तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते ते स्पष्ट केले. यावेळी शिक्षण सभापतींना प्रिन्सिपॉल हॅण्डरसन यांनी शाळेची बाजू व पाल्यांचे नुकसान होऊ देणार नाही हमी देवून पालकांना फी भरण्यास सांगितले. यावर शिक्षण सभापती यांनी पालक व शाळेची बाजू ऐकूण घेत पालकांना सोमवारपर्यंत काही ठराविक रक्कम भरण्याचे सांगितले व उर्वरित रक्कम ही चार महिन्यापर्यंत भरण्याबाबत सांगितले. मुख्याध्यापक हॅण्डरसन यांनी आम्ही पालकांनी पाल्याचे नुकसान होऊ देणार नाही त्यांची परीक्षा घेऊ अशी हमी दिल्याने पालकांचे समाधान झाले तर शिक्षण सभापतींनी मुलांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याने शाळेला नोटीस बजविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/185404190243042

 

Protected Content