शाहु नगरातील रुग्णालयासमोरुन दुचाकी चोरी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहु नगरातील रूग्णालयासमोर नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची पार्किंगला लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, नवनाथ बापुराव राऊत (वय-४५) रा. एमडीएस कॉलनी, मेहरूण यांची पत्नी शोभा राऊत यांना शहरातील शाहु नगरातील नॉर्दन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.तत्पूर्वी त्यांनी त्यांची एम.एच.१९ सी.सी.७३५९ या क्रमांकाची दुचाकी रुग्णालयासमोर लावली होती.रविवारी सकाळी ७.३० वाजता दुचाकी रुग्णालयासमोर आढळून आली नाही.त्यांनी शहरात दुचाकीचा शोध घेतला.ती आढळून आली नाही.दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content