शाहीन बागचा ‘जालियनवाला बाग’ होऊ शकतो : ओवेसी

owesi

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  शाहीन बागचा ८ फेब्रुवारीनंतर जालियनावाला बाग होऊ शकतो, अशी भीती एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केली आहे.

 

सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात (सीएए) दिल्लीतील शाहीन बाग येथे गेल्या ५० दिवसांपासून महिलांचे धरणे आंदोलन सुरु आहे. त्यातच दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रचारात शाहीन बाग आंदोलन केंद्रस्थानी राहिले आहे. या पार्श्वभूमीवर एएनआयशी बोलताना ओवेसी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ८ फेब्रुवारीनंतर शाहीन बाग येथील आंदोलकांना हटवण्यात येईल, असे संकेत केंद्र सरकारकडून मिळत आहेत. याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारणा आली. यावर उत्तर देताना ओवेसी म्हणाले, कदाचित इथल्या आंदोलकांवर सरकार गोळीबार करेल. अशा प्रकारे ते शाहीन बागचे रुपांतर जालियनवाला बागमध्ये करतील. कारण भाजपाच्या मंत्र्याने गोळ्या झाडा असे म्हटलेच आहे.

Protected Content