शासनाची फसवणूक करणाऱ्या ५ ग्रामसेवकांची अपंगत्वाचे प्रमाणपत्र रद्द

रावेर प्रतिनिधी । अपंगत्वाचे खोट प्रमाणपत्र देवून शासनाची फसवणूक करून त्याचा लाभ घेतलेल्या रावेर तालुक्यातील ५ ग्रामसेवकांचे प्रमाण पत्र रद्द करण्यात आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की,  रावेर तालुक्यातील ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे खोटे दाखले मिळवून नोकरीत बदली करण्यासाठी व सोयी लाटण्यासाठी त्यांचा वापर केलेले दाखले. धुळे शासकीय वैदकीय महाविद्यालयाच्या त्रिस्तरीय समितीने रद्द केले आहे, रद्द करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात नितीन दत्तू महाजन, राहुल रमेश लोखंडे, रवींद्रकुमार काशिनाथ चौधरी, छाया रमेश नेमाडे, शामकुमार नाना पाटील या पाच ग्रामसेवकांचा समावेश आहे. संबंधित ग्रामसेवकांनी सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी व इतर लाभ घेण्यासाठी या सर्टिफिकेटचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई बाबत पंचायत समितीकडून जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पाठवणार येणार आहे.

Protected Content