जळगाव प्रतिनिधी । एकीकडे जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले असतांना जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात तीन कोरोना संशयित असणार्या रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा शासकीय कोरोना रुग्णालयात सोमवारी दाखल तीन कोरोना संशयित रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला. यात दोन वृद्ध व १४ वर्षीय बालकांचा समावेश आहे. यातील ६५ वर्षीय वृद्ध हा मलकापूरचा रहिवासी असून त्यांना हर्नीयाचा त्रास होता. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्याचे सुचविण्यात आले होते. मात्र हॉस्पीटलमध्ये दाखल करत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. दुसरा ७३ वर्षीय कोरोना संशयित वृद्ध हा टीबीचा रुग्ण होता. त्यांना श्वसनाचा व न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. तर तिसरा संशयित रूग्ण हा १४ वर्षांचा मुलगा होता. त्याला मधुमेहाचा त्रास होता.
मृत्यूआधी या तिनही रूग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असून आता त्यांच्या रिपोर्टमध्ये नेमके काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००