Home Cities जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.

यावेळी जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा.विलास मालकर यांनी महात्मा फुले यांच्या चरित्र व कार्याविषयी माहिती सांगितली. सूत्रसंचालन कार्यालय अधीक्षक समीर देवसंत यांनी केले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, मुख्य प्रशासकीय अधिकारी जी.जी. दिघावकर, डॉ.जितेंद्र सुरवाडे यांच्यासह डॉक्टर्स अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound