शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात २०० दिव्यांगांची तपासणी

जळगाव, प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार  २५ ऑगस्ट रोजी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज झाले. आता पुढील ७ बुधवारची कुपन संपली असून दि. २० ऑक्टोबरचे कुपन कार्यालयीन वेळेत वितरित करण्यात येत आहे. 

 

ज्या  दिव्यांग बांधवानी २५ ऑगस्टचे कुपन घेतले होते अशा २०० दिव्यांगांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. दर बुधवारी होणारी गर्दी आणि गैरसोय पाहता दिव्यांग मंडळाने सुरु केलेल्या आगाऊ बुकिंग कुपन प्रणालीला चांगला उदंड प्रतिसाद लाभला आहे.  उपअधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष डॉ. मारुती पोटे, मंडळाचे सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगीता गावित यांच्यासह तज्ज्ञ  डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. दिलीप महाजन, डॉ. विनोद पवार, डॉ.प्रसन्ना पाटील, डॉ. गिरीश राणे, डॉ. नेहा भंगाळे यांनी दिव्यांगांची तपासणी केली.  डॉ. पूजा भोळे, डॉ. प्राजक्ता पाटील, कर्मचारी चेतन निकम, दत्तात्रय पवार, अनिल निकाळजे, विशाल दळवी, आरती दुसाने, भूषण निकम, वाल्मिक घुले, प्रकाश पाटील, अजय जाधव, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.

 

Protected Content